वृत्तसंस्था/ शारजा
नवीन चेहरामोहरा प्राप्त झालेला भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघ आज गुऊवारी येथे नवीन मुख्य प्रशिक्षक क्रिस्पिन छेत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक लेडीज कपच्या पहिल्या सामन्यात जॉर्डनचा सामना करण्यास उत्सुक असेल.
या स्पर्धेत रशिया आणि कोरिया प्रजासत्ताक हे इतर संघ आहेत. उल्लेखनीय म्हणजे भारतीय संघात वरिष्ठ खेळाडू आशालता देवी आणि बाला देवी नसून काही तऊण खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. भारत आशियामध्ये 13 व्या, तर जगात 69 व्या क्रमांकावर आहे आणि जॉर्डन खंडात 14 व्या, तर जगात 74 व्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ एकमेकांविऊद्ध तीन सामने खेळले आहेत, ज्यात प्रत्येकी एक त्यांनी जिंकला आहे आणि एक बरोबरीत सुटला आहे.
या महिन्याच्या सुऊवातीला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या छेत्री यांना वाटते की, आशिया खंडाच्या पातळीवर संघ म्हणून प्रगती करण्यासाठी भारताने सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. गेल्या काही वर्षांत जॉर्डनने चांगली प्रगती केली आहे, परंतु जर आपल्याला प्रगती करायची असेल, तर हे सामने जिंकावे लागतील असे मला वाटते, असे छेत्री यांनी सांगितले.
‘आमच्याकडे तऊण आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे’, असे भारतीय युवा संघाकडून खेळलेल्या 50 वर्षीय छेत्रीने सांगितले. भारतीय संघासाठी शारजाला जाण्यापूर्वी आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले होते.









