चेन्नई :
भारतीय फीनटेक कंपनी पाइन लॅब्ज यांचा आयपीओ 7 नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 11 नोव्हेंबरला बंद होणार आहे. इतर कंपन्यांप्रमाणेच आता पाइन लॅब्ज कंपनी सुद्धा आपला आयपीओ लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी पॉईंट ऑफ सेल टर्मिनल्ससारखी पेमेंट सुविधा प्रदान करते. सध्याला बाजारात असणाऱ्या पेटीएम आणि फोन पे सारख्या कंपन्यांशी ही कंपनी स्पर्धा करते आहे. सध्याचे मोठे गुंतवणूकदार पीक एक्सवी पार्टनर्स, पेपाल व मास्टर कार्ड हे आता एकत्रित 82.3 दशलक्ष समभाग विक्री करण्याची योजना बनवत आहेत. आता 3900 कोटी रुपये आयपीओच्या माध्यमातून उभारण्याची तयारी कंपनी करत आहे. यासाठी समभागाची किमत 210-221 रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आली आहे.









