Laxman Jagtap Passed Away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.गेली 3 वर्षे ते कर्करोगामुळे आजारी होते. अखेर आज त्यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज थांबली.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्ये चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी उपचारासाठी पुण्यातून मुंबईपर्यंत प्रवास केला होता. अॅम्ब्युलन्समधून विधानसभेपर्यंत प्रवास करुन त्यांनी हे मतदान केले होते.राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचे सर्व श्रेय या दोन्ही सदस्यांना दिले होते.काही दिवसांपूर्वीच मुक्ता टिळक यांचे निधन झाले. तर आज लक्ष्मण जगतापांनी अखेरचा श्वास घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









