प्रतिनिधी / म्हापसा
पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील बर्जर बेकर कोटिंग या पेंट कंपनीस आग लागल्यानंतर तिसऱया दिवशीही अग्निशामक दलाचे इथे काम सुरूच होते. गोदामाच्या जाग्यावरील ढिगारा हटवून तिथे जवानांकडून पाण्याचा मारा केला जात होता. जेणेकरून ही आग पूर्णपणे विझावी. सायंकाळपर्यंत हा धुमसण्याचा प्रकार बंद होणार असे दलाने म्हटले आहे.
गुरुवारी दि. 12 रोजी देखील दलाचे जवान घटनास्थळी ढिगाऱयावर पाणी-फोमचा मिश्रित फवारा मारत होते. बुधवारी सकाळी 6.30 वा. ही आग अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर पूर्णपणे आटोक्मयात आणली होती. मात्र, काही ठिकाणी धुमसण्याचा प्रकार सुरूच होता. जो तिसऱया दिवशी बऱयापैकी नियंत्रणात आला होता.
50 कोटींपर्यंत नुकसान
या आगीच्या नुकसानीची नेमकी अधिकृत हानी समोर आली नसली तरी नुकसानीचा आकडा हा 50 कोटीपर्यंत जाण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.









