चीनच्या डॉक्टरांनी केली कमाल
चीनच्या सर्जन्सनी एका ब्रेन-डेड माणसात डुकराच्या फुफ्फुसाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण केले आहे. डॉक्टर याला जेनोट्रान्सप्लांटेशनच्या क्षेत्राला एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानत आहेत. सर्जन्सनी पहिल्यांदाच एका आनुवांशिक स्वरुपात संशोधित डुकराच्या फुफ्फुसाला एका ब्रेन डेड मानवात प्रत्यारोपित केले आणि हे फुफ्फुस 9 दिवसांपर्यंत काम करत राहिल्याचे आढळून आल्याचा खुलासा संशोधकांनी केला आहे.
नेचर मेडिसीन या नियतकालिकात याचा विस्तृत तपशील प्रकाशित करण्यात आला आहे. आनुवांशिक स्वरुपात वापरात आणण्यावरून एक किरकोळ परंतु आशादायक पाऊल म्हणुन याकडे पाहिले जात आहे. हे ऑपरेशन गुआंगजौ मेडिकल युनिव्हर्सिटीशी संलग्न रुग्णलयात पार पडले आहे. यात 39 वर्षीय पुरुषाच्या फुफ्फुसाला बदलणे सामील होते. या पुरुषाच्या मेंदूत गंभीर रक्तस्त्राव झाला होता. डुकराचे फुफ्फुस मानवी पेशींसोबत स्वत:ची अनुकूलता वाढविण्यासाठी आनुवांशिक स्वरुपात संशोधित करण्यात आले होते. हे फुफ्फुस मानवी शरीरात 9 दिवसांपर्यंत कार्य करत राहिले. या कालावधीदरम्यान अवयवाने ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साइडचे प्रभावीपणे आदान-प्रदान केले, यामुळे हे स्वत:च्या प्राथमिक कार्याला करण्याची क्षमता प्रदर्शित करत असल्याचे संशोधकांकडून सांगण्यात आले.









