पियर्स ब्रॉसनन लवकरच ब्रिटिश-येमेनी बॉक्सर प्रिन्स नसीम ‘नाज’ हमीदच्या बायोपिकमध्ये दिसून येणार आहे. स्पोर्ट्स ड्रामा पट ‘जायंट’मध्ये पियर्स हे अमीर अल-मसरीसोबत अभिनय करताना दिसून येतील. चित्रपटाची कहाणी बॉक्सिंग चॅम्पियन आणि त्यांचे आयरिस वंशाचे बॉक्सिंग प्रशिक्षक ब्रेंडन इंगल यांच्यावर बेतलेली आहे. चित्रपटात अल-मसरी हे नाजची भूमिका साकारतील. तर ब्रॉसनन इंगल यांच्या व्यक्तिरेखेत असतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोवन अथाले करणार आहेत. चित्रपटाची कहाणी त्यांनीच लिहिली आहे. टी शॉप प्रॉडक्शन्सचे मार्क लेन आणि व्हाइट स्टार प्रॉडक्शन्सचे केविन सॅम्पसन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. एजीसीचे अध्यक्ष आणि सीईओ स्टुअर्ट फोर्ड देखील निर्मात्यांमध्ये सामील आहेत. कार्यकारी निर्माता म्हणून बाल्बोआ प्रॉडक्शन्सचे सिल्वेस्टर स्टेलोन आणि ब्रँडेन आफ्टरगुड, एजीसी स्टुडिओचे मिगुएल पालोस, जॅच गॅरेट आणि नंतर टॅमीरियसा हे या चित्रपटाशी जोडले गेले आहेत. याचे चित्रिकरण इंग्लंडच्या लीड्समध्ये सुरू झाले आहे.
Previous Article‘बदतमीज गिल’मध्ये वाणी कपूर
Next Article महागाई दराच्या अहवालामुळे बाजारात उत्साह
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









