दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी
साटेली भेडशी प्रतिनिधी
दोडामार्ग विजघर राज्यमार्गावरील वायंगणतड येथे मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मालवाहक पिकअप गाडी बेळगावच्या दिशेने जात असताना येथील वळणावर आली असता गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला मोठी धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही बाहेर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दोघांची स्थिती चिंताजनक आहे.यातील एकाला दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन एकाला बांबोळी- गोवा येथे हलविण्यात आले आहे.दुचाकीवरील अपघातग्रस्त हे घोटगेवाडी येथील आहेत.अपघातानंतर स्थानिक नागरिक, घोटगेवाडी ग्रामस्थ,लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत उपचारासाठी मदतकार्य केले.









