सावंतवाडी प्रतिनिधी
क्रीडा मार्गदर्शकाबरोबरच प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकांनी ‘क्रीडा पत्रकारितेचाही’ छंद जोपासावा, आजच्या काळात’ क्रीडा पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक दैनिकात आज क्रीडा वृत्तासाठी किमान एक संपूर्ण पृष्ठ राखून ठेवण्यात येत असून.क्रीडा शिक्षकांनी विविध खेळांच्या प्रचार -प्रसाराठी तसेच खेळाडुंची प्रतिभा उंचावण्यासाठी बातम्याच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा पत्रकार दत्तात्रय मारकड यांनी सावंतवाडी येथील क्रीडा शिक्षकांच्या शिबिरात केले.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत यशवंतराव भोसले तंत्र शिक्षण महाविद्यालय,सावंतवाडी येथे आयोजित ‘ जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित ‘जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरात प्रमुख वक्ते म्हणून दत्तात्रय मारकड बोलत होते.”क्रीडा पत्रकारिता”या विषयावर बोलताना दत्तात्रय मारकड पुढे म्हणाले की, मराठी पत्रकारितेचा इतिहास अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरु झाल्याचा सांगून त्यांनी विविध खेळांच्या विविध आशयाच्या बातम्या कशा लिहिल्या जातात या संदर्भात याप्रसंगी सविस्तर मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रमुख वक्ते दत्तात्रय मारकड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी व्यासपीठावर तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, या शिबिराचे तज्ञ मार्गदर्शक रामचंद्र घावरे, पंकज राणे अजिंक्य पोकळे,अमित भाटकर व जयश्री कसालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला माध्यमिक शाळेतील सुमारे 60 पेक्षा अधिक क्रीडा शिक्षक 15 जून पासून प्रशिक्षण घेत आहेत, तर दि. 22 जून रोजी या प्रशिक्षणाचा सांगता समारंभ होणार आहे.









