बेळगाव – न्यू इयर साजरा करताना तरुणांच्या टोळक्याने पोलीस परिवारातील एका बालिकेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना दावणगेरे नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग जवळ घडली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांचे टोळके जिथे न्यू इयर साजरा केला जात होता तिथे पोहचले आणि तेथील मुलींचे फोटो काढायला सुरु केली. असे का करत आहात ? असे प्रश्न विचारताच हनुमंतप्पा यांच्या पोलीस परिवारावर बाटलीने हल्ला केला. या घटनेत हनुमंतप्पा यांची मुलगी ऐश्वर्या (वय – १६) जखमी झाली. कारचे ग्लास फुटून तिच्या डोळ्याला आणि डोक्याला जखम झाली . तिला ताबडतोब उपचारासाठी शिमोगा इस्पितळात नेण्यात आले. हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महिला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
Previous Articleजागतिक अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश भाग यंदा मंदीच्या सावटाखाली
Next Article महिलेने भर बाजारात तळीरामाला दिला चोप









