ऑनलाईन टीम/तरुण भारत
“नाना पटोले (nana patole), एकनाथ खडसे (eknath khadse), माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर येत आहे. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना आमच्यावर नजर ठेवत नव्या सरकारसंबंधी माहिती घेतली जात होती. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला,” असं संजय राऊत (sanjy raut) म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. आता याविषयी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन समाजविघातक घटक म्हणून टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोन टॅपिंग (phone tapping) प्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पत्रातून ही माहिती उघड झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन समाजविघातक घटक म्हणून टॅप झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊतांचा फोन ६० वेळा तर एकनाथ खडसे यांचा फोन ६७ टॅप करण्यात आला होता. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.