पुणे येथे होणार राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : पुणे येथे होणाऱ्या बीके बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन पुणे आयोजित आयपीएससी चषक 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या फिनिक्स पब्लिक स्कूल होनग्याचा संघ गुरुवारी पुण्याला रवाना झाला आहे. सदर फुटबॉल स्पर्धेत 17 राज्यातील आयपीएससी संघ सहभागी होणार आहेत. साखळी व बाद पद्धतीचे सामने खेळविण्यात येणार आहेत. सहभागी फिनिक्स स्कूलच्या खेळाडूना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल बेनके, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फुटबॉलपटूंचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू पुढीलप्रमाणे, मुदेनगौडर (कर्णधार), आदीराज देसाई, पालाश मेळगीनमनी, ओम पाटील, नूतन पुरद, रुद्र पाटील, स्वराज्य आनंदाचे, दर्शन पावले, हुजेर तासिलदार, वेदांत हन्नीकेरी, साकिबल हासन, हरीष यरगट्टी, बिलाल सय्यद, शिवराज रेडेकर, प्रेम पाटील, अप्पण्णवर तर प्रशिक्षक हर्ष रेडेकर, संघ व्यवस्थापक महांतेश गवी यांचा समावेश आहे.









