बेळगाव : ओरी ओनिस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुरस्कृत ग्रासरुट चषक 12 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत फिनिक्स स्पोर्ट्स, केएलई इंटरनॅशनल, गडहिंग्लज युनायटेड, जेन हेरिटेज ब, मॅजिक स्पोर्टींग संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. सेंटपॉल्स स्कूल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात पहिल्या सामन्यात फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिलिंग संघाने केएलई इंटरनॅशनल ब संघाचा 5-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल अ संघाने जैन हेरिटेज ब संघाचा 3-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड ब संघाने केएलई ब चा 9-0 असा पराभव केला.
चौथ्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड अ संघाने फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिलिंग संघाचा 1-0, पाचव्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड ब संघाने जैन हेरिटेज अ संघाचा 7-0 असा पराभव केला. सहाव्या सामन्यात जैन हेरिटेज ब ने केएलई अ चा 2-1 असा पराभव केला. सातव्या सामन्यात मॅजिक स्पोर्टींग इंडियन संघाने गडहिंग्लज अ चा 2-0, आठव्या सामन्यात मॅजिक स्पोर्टींग वॉरियर्स संघाला जीवनज्योती संघाने 0-0 बरोबरीत रोखले. नवव्या सामन्यात गडहिंग्लज ब ने बाशिनी संघाचा 5-0 असा पराभव केला. दहाव्या सामन्यात जैन हेरिटेज ब ने मॅजिक स्पोर्टींग वॉरियर्सचा 5-0, 11 व्या सामन्यात मॅजिक स्पोर्टींग इंडियनने जीवनज्योती ब चा 1-0 तर 12 व्या सामन्यात गडहिंग्लज अ संघाने बाशिनी संघाचा 14-0 असा एकतर्फी पराभव केला.









