प्रतिनिधी/ बेळगाव
फिनिक्स स्कूल आयोजित 24 व्या फौंडर वीकनिमित्त आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धाचे वेळापत्रक शुक्रवारी काढण्यात आले.
कनक मेमोरियल स्कूलच्या सभागृहात प्रमुख पाहुणे रॉयस्टीन जेम्ससह इतर मान्यवरांच्या हस्ते 14 वर्षाखालीलचे वेळापत्रक काढण्यात आले. या स्पर्धेत एकूण 15 संघांनी भाग घेतला असून त्यात सेंट क्र्पॉल्स, केएलई, भातकांडे, ज्योती, मराठी विद्यानिकेतन, शेख सेंट्रल, कनक मेमोरियल, केएलएस, फिनिक्स, संजय घोडावत, इस्लामिया, भरतेश, सेंट झेवियर्स, विजया व एमव्हीएम आदी संघांचा समावेश असून पाच गटात विभागण्यात आले आहे. अ गटात सेंटपॉल्स, केएलई, भातकांडे, ब गटात ज्योती, मराठी विद्यानिकेतन व शेख, क गटात कनक मेमोरियल, केएलएस व फिनिक्स, ड गटात संजय घोडावत, इस्लामिया व भरतेश तर ई गटात सेंट झेवियर्स, विजया व एमव्हीएम आदी संघांना विभागण्यात आले आहे. 28 ते 30 दरम्यान या संघाचे साखळी सामने खेळविण्यात येणार असून 1 व 2 रोजी उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.









