वृत्तसंस्था/ हैदराबाद
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स संघातील अष्टपैलू न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स याला स्नायू दुखापत झाल्याने तो या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नसल्याची घोषणा गुजरात टायटन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
या दुखापतीवर वैद्यकीय इलाज करुन घेण्यासाठी फिलिप्स येत्या दोन दिवसात मायदेशी परतनार आहे. 6 एप्रिल रोजी झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळताना अष्टपैलू फिलिप्सच्या उदराचा स्नायू दुखावला होता. गुजरान टायटन्स संघातील दुखापतीमुळे मायदेशी परतणारा ग्लेन फिलिप्स हा दुसरा खेळाडू आहे. तत्पूर्वी या संघातील दक्षिण आफ्रिकेचा वेगवाग गोलंदाज रबाडा काही वैयक्तिक समस्येमुळे मायदेशी परतला होता.









