Philanthropy of Youth Kala Krida Mandal in Sonurli
सोनुर्ली येथील नवयुवक कला क्रिडा मंडळाने सामाजिक भान ठेऊन यावर्षी पार पडलेल्या एस. पी. एल २०२३ क्रिकेट स्पर्धेच्या शिल्लक रक्कमेतून काही वाटा बाजूला काढत आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयाला अन्नधान्यासह दैनंदिन वापराचे साहित्य वितरण केले .नवयुवक कला क्रिडा मंडळ गेली पाच वर्षे एस.पी.एल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत त्यापूर्वी शैक्षणिक तसेच आर्थिक स्वरूपात मंडळाने सहकार्य केलेले आहे. यावर्षीही दोन गरजू व्यक्तीना मंडळाने आर्थिक मदत करण्याबरोबरच आरोस दांडेली येथे मतिमंद निवासी विद्यालयाला मंडळाने सहकार्य केले .
यावेळी मंडळांचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर , सदस्य संदिप जाधव , सत्यवान हिराप , सचिन साळगावकर, सत्यवान नाईक, सागर तेंडुलकर, संदू मसुरकर, राजाराम मठकर, आनंद देऊलकर , रुपेश हिराप आदी उपस्थित होते . या ठिकाणी विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी काळजी तसेच त्यांचे दैनंदिन व्यवस्था लक्षात घेता तेथील कर्मचाऱ्यांचे कार्य शब्दात न व्यक्त करण्याऐवढे आहे असे उध्दार मंडळांचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर यांनी बोलताना कांढले तर विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत यांनी विद्यालयाची गरज ओळखून तसेच कार्य लक्षात नवयुवक कला क्रिडा मंडळाने केलेल्या व्यक्तीबाबत आभार व्यक्त केले व भविष्यातही मंडळाने विद्यालयाला मदतीचा हात पुढे करावा अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विद्यालयाचे शिक्षक प्राणेश नाईक सौ. नंदिनी आचरेकर, सौ. सरोज चव्हाण, सौ. नंदा सावंत , सुलोक्षणा कोकरे, रामचंद्र गोडकर व इतर कर्मचारी उपस्थित होते .
न्हावेली / वार्ताहर









