राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरूवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकत जवळपास १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी याविरोधात निदर्शने केली. काल पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.याप्रकरणानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनी PFIच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आज भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. आता कुठल्या बिळात बसला आहात? असा सवालही त्यांनी केला आहे.
ट्विट करत काय म्हणाले आशिष शेलार
पीएफआयचा देशविरोधी कट उघड, पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा..मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या…हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या…सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे…उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात
इतिहासातील खानांची सदैव “उचकी” लागणारे,भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले..संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे “होर्डिंग” लावणारेआतापीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत… आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत! आता कुठल्या बिळात बसला आहात? असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









