CM Eknath Shinde On PFI Ban In India : अतिरेक्यांना पैसा पुरवल्याच्या आणि त्यांना प्रशिक्षण दिल्याच्या आरोपाखाली देशभरात पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती.
केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांकरिता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि एनआयएनं देशातील अनेक शहरांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी सुरु केली आहे. यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात आता या आरोपींची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची दिल्लीत बैठक झाली होती. त्यानंतर आता या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत स्वागत केले आहे. शिवाय याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पीएफआयच्या बंदीवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी गोदावरीच्या काठावरील स्वामीनारायणाची मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य आहे, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, केंद्र आणि राज्यातील गृहखातं चांगलं काम करत असून राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यां विरोधात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी गोदावरीच्या काठावरील स्वामीनारायणाची मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
Previous Articleनगरमध्येही PFI च्या दोन कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
Next Article एनआयएचा कोल्हापुरात छापा, तरुण ताब्यात








