निश्चित शुल्क भरल्यानंतर मिळणार परवानगी
बेळगाव : परिवहन मंडळाच्या बसेसमधून आता प्राण्यांच्या प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी निश्चित शुल्क भरल्यासच प्राण्यांच्या प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे. परिवहन बसमधून वॉशिंग मशीन, फ्रिज, ट्रक टायर, अल्यूमिनियम पाईप, भांडी, लोखंडी पाईपच्या वाहतुकीसह मांजर, कुत्रे आणि ससा यांना प्रवास करता येणार आहे. मात्र प्राणी मालकांना प्राण्यांमुळे इतर प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. पाळीव प्राण्यांना मोफत बसमधून नेण्यास परवानगी नाही. यासाठी निश्चित शुल्क आकारण्यात येते.
कुत्र्याला पुरुषांप्रमाणेच शुल्क आकारण्यात येणार आहे. मांजर, ससा व पिंजऱ्यातील पक्ष्यांसाठी शुल्क निश्चित केले असून ते भरल्यानंतरच प्राण्यांना बसमधून घेऊन जाता येणार आहे. एका पुरुष प्रवाशांप्रमाणे किंवा मुलांच्या तिकीटाप्रमाणे तिकीट शुल्क आकारण्यात येणार असून मालकांना मात्र खबरदारी घेऊन सीट व प्रवाशांच्या साहित्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. ट्रक टायर्सना युनिट 3 मानले जाते. 60 कि. मी. पर्यंत वस्तू घेऊन जाता येते. तर फ्रिज, सायकल, वॉशिंग, कार टायर हे युनिट 2 मानले जाते. टेबल फॅन, हार्मोनियम, टीव्ही, संगणक, सीपीयू, बॅटरी, 20 किलोपर्यंत 25 लिटरचे रिकामे कंटेनर हे युनिट 1 मानले जाते. त्याचबरोबर रेशीम वस्तू प्रति 15 किलोपर्यंत युनिट 1 मानले जाते.









