पेट्रोल ९.५ रुपये, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार
ऑनलाईन टीम/तरुण भारत
पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel) गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. असे असताना केंद्राने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपयांची कपात केली आहे. तर डिझेलवरील एक्साईज ड्युटी ७ रुपये प्रतिलिटर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्राकडून देशवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सोबतच घरगुती गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे.
गेल्या सात महिन्यातील हा दुसऱ्यांदा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलने किंमती शंभरच्या पुढे गेल्या होत्या. त्यामुळे देशातील महागाई वाढली होती. त्यामुळे इंधनावरील कर कमी करण्याची मागणी करण्यात आली होती.
स्वयंकाप घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी ही घोषणा केलीय. हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.