वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून ती न्यायालयाने स्वीकारली आहे. मध्य प्रदेशातील सिवनी येथील रहिवासी विजय नंदन यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात उमेदवारी दाखल केली असता कोणतेही कारण न देता आपला उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा आरोप विजय यांनी केला आहे. सदर याचिकेत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी वाराणसी आणि पंतप्रधान मोदी यांना प्रतिवादी बनवले आहे. या याचिकेवर लवकरच अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्मयता आहे









