वृत्तसंस्था/ लंडन
येथे झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीमध्ये झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी अग्रमानांकित एलिस मर्टेन्स व झँग शुआई यांच्यावर विजय मिळविला.
क्रेसिकोव्हा-सिनियाकोव्हा यांचे या स्पर्धेतील हे दुसरे जेतेपद असून या जोडीने अगमानांकित जोडीवर 6-2, 6-4 अशी मात केली. त्यांचे हे एकूण पाचवे व या वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या जोडीने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही ऍना डॅनिलिना व बियाट्रिझ हदाद माइया यांचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. याआधी 2018 मध्ये या जोडीने विम्बल्डनमध्ये जेतेपद मिळविले होते. येथे जेतेपद मिळविताना त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत फक्त एक सेट गमविला होता.









