वृत्तसंस्था/ ओस्ट्रेव्हा (झेक प्रजासत्ताक)
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या ओस्ट्रेव्हा महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बार्बोरा पेसिकोव्हाने एकेरीचे अजिंक्मयपद मिळविताना पोलंडच्या टॉप सीडेड स्वायटेकला पराभवाचा धक्का दिला.
या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात पेसिकोव्हाने इगा स्वायटेकचा 5-7, 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत स्वायटेकचा एकेरीतील हा दुसरा पराभव आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्वायटेकने पहिला सेट 7-5 असा जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱया सेटमध्ये क्रेसिकोव्हाने आपली सर्व्हिस अधिक वेळ राखत तसेच बेसलाईन खेळावर अधिक भर देत हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबविला. पेसिकोव्हाने हा सेट 7-6 (7-4) असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱया आणि निर्णायक सेटमध्ये पेसिकोव्हाच्या वेगवान फटक्मयांसमोर स्वायटेकला केवळ 3 गेम्स जिंकता आले. हा अंतिम सामना 3 तास 16 मिनिटे चालला होता.









