प्रतिनिधी /बेळगाव
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयादीला आधार क्रमांक लिंक करण्याची सूचना केली आहे. ही मोहीम 2 महिन्यांपासून सुरू असून केवळ 30 टक्के मतदारांचे आधार लिंक झाले आहे. दरम्यान, मतदारांकडून सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आधार ओळख पत्राखेरीज अन्य अकरांपैकी एका कागदपत्राची जोडणी मतदारयादीस करता येवू शकते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
मतदारांचे आधार ओळखपत्र क्रमांक मतदारयादीला जोडण्याची सूचना केली असल्याने बीएलओंच्या माध्यमातून आधारलिंकचे काम सुरू आहे. मात्र, या मोहिमेला शहरवासियांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या महसूल विभागाचे कर्मचारी आणि बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी जावून आधार ओळखपत्र क्रमांकाची मागणी करण्यात आली. पण आधार ओळखपत्र देण्यास टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने शहराच्या दोन्ही मतदारसंघातील 30 टक्के मतदारांचे आधार क्रमांक लिंक केले आहे.
आधार क्रमांक उपलब्ध होत नसल्याने बीएलओ आणि मनपा कर्मचाऱयांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधारलिंकसाठी महापालिकेने सुटीच्या दिवशी विशेष मोहीम राबविली. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील याकरिता अभियान राबविले होते. तरीदेखील आधारलिंकचे काम संथगतीने सुरू आहे. आधार ओळखपत्राचा दुरुपयोग होईल, या धास्तीने आधार क्रमांक देण्यास नागरिक टाळत आहेत. त्यामुळे व्होटर्स हेल्पलाईन या ऍपच्या माध्यमातून आधारक्रमांक घरबसल्या जोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. यादेखील प्रतिसाद मिळालेला नाही. आधार ओळखपत्राखेरीज अन्य अकरांपैकी एका कागदपत्राची जोडणी करणे शक्मय असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आधार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास खालील पैकी एका कागदपत्राची जोडणी मतदारयादीला करता येवू शकते
- मनरेगा जॉबकार्ड
- पॅनकार्ड
- भारतीय पासपोर्ट
- निवृत्ती वेतन प्रमाण पत्र
- सर्व्हिसकार्ड
लोकप्रतिनिधींना देवू केलेले ओळख पत्र- युनिक आयडेंटीटी कार्ड
- वाहनचालक परवाना
- बँक किंवा पोस्ट कार्यालय खात्याच्या पास बुकची फोटोसहित असलेली प्रत
- कामगार खात्याच्या आरोग्य विमा स्मार्टकार्डची प्रत
- एनपीआर योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेले स्मार्ट कार









