प्राइम व्हिडिओकडून तिसऱ्या सीझनची घोषणा
प्राइम व्हिडिओने बहुप्रतीक्षित रोमँटिक ड्रामा ‘परमानेंट रुममेट्स’च्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. श्रेयांश पांडे यांच्या दिग्दर्शनात तयार आणि द व्हायरल फिव्हरकडून निर्मित या सीरिजमध्ये सुमीत व्यास आणि निधी सिंह मुख्य भूमिकेत आहे. परमानेंट रुममेट्स 3 चा प्रीमियर देशविदेशात होणार आहे. परमानेंट रुममेट्सच्या नव्या सीझनची घोषणा करताना आम्ही रोमांचित झालो आहोत. या सीरिजने नेहमीच आमच्या मनांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. मिकेश आणि तान्या या व्यक्तिरेखांसाठी आम्हाला अभूतपूर्व प्रेम आणि समर्थन मिळाले. याचमुळे आम्ही याचा पुढील अध्याय सादर करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत असे श्रेयांश पांडे यांनी सांगितले आहे. टीव्हीएफसोबत आमचे सहकार्य वास्तवात अत्यंत चांगलेच राहिले आहे. आम्ही पुन्हा एकदा मिळून काम करत आहोत. 18 ऑक्टोबरपासून परमानेंट रुममेट्स 3 चे सादरीकरण करण्यासाठी रोमांचित आहोत असे उद्गार प्राइम व्हिडिओ इंडियाचे कंटेंट लायसेंसिंग दिग्दर्शक मनीष मेंघानी यांनी काढले आहेत. परमानेंट रुममेट्स या सीरिजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले असल्याने याचा मोठा चाहतावर्ग आहे.









