कोल्हापूर :
शहरामध्ये रंकाळा तलावानजीक रंकाळा टॉवर परिसरात नो पार्किंग झोन करुन सायंकाळ 5 ते रात्री 9 या वेळेत वाहतुक मार्गात बदल केला होता. दुचाकी वाहनांना पार्कींग सुविधा करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने 3 मार्च पर्यंत ही नियमावली प्रायोगिक तत्वावर केली होती. यासंदर्भात कोणत्याही हरकती आल्या नसल्याने बुधवार दि. 26 पासून हीच नियमावली कायमस्वरूपी करण्यात आली असल्याचे आदेश शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरिक्षक नंदकुमार मोरे यांनी काढले आहेत.
रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस परिसरात रात्रीच्यावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होती. यामुळे पोलिस प्रशासनाने 17 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान,येथे रात्रीच्यावेळी वाहतुक नियमावलीमध्ये प्रायोगिक तत्वावर बदल केले होते. यामध्ये पार्कींग झोन, नो पार्कींग झोन आणि एकेरी वाहतुक (वन वे) यांचा समावेश होता. नागरिकांकडून व वाहन चालकाकडून अगर संघटनाकडून हरकती, तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने येथील बदलेली वाहतूक नियमावली येथून पुढेही कायम ठेवण्याचा आदेशही दिले आहेत.
- वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर शहरामध्ये रंकाळा टॉवर चौकास मिळणारे रस्ते 1) फुलेवाडी नाका ते रंकाळा टॉवर 2) खराडे महाविद्यालय ते जॉकी बिल्डींग 3) कृष्णा मेडीकल दुकान ते रंकाळा टॉवर या तिन्ही मार्गावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या मोटार वाहनांच्यामुळे वाहतुकीचा खोंळबा होवून रहदारीस अडथळा निर्माण होतो. येथील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग नो पार्कींग झोन केला आहे.
- सर्व प्रकारच्या वाहनासाठी (अधिकृत रिक्षा स्टॉप वगळून) दोन्ही बाजूने नो पार्किंग झोन असणारे मार्ग
–डी मार्टपासून रंकाळा टॉवर
–खराडे महाविद्यालय ते जॉकी बिल्डींग
–कृष्णा मेडीकल दुकान ते रंकाळा टॉवर
–रंकाळा स्टॅन्ड ते साकोली कॉर्नर ते कै. गोविंदराव देसाई चौक (बहीर्जी पथ)
- दुचाकी वाहनासाठी पार्किंग नियोजन
–रंकाळा टॉवर येथील करवीरतीर्थ बिल्डींगमधील श्रावस्ती हॉस्पीटलचे बेसमेंट मधील पे अॅन्ड पार्क
- सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत वळविण्यात आलेला वाहतुक मार्ग
–रंकाळा स्टॅन्ड येथून रंकाळा टॉवरकडे जाणारी सर्व प्रकारची जड–अवजड वाहने, टेंपो ट्रॅव्हलर, एस. टी. बसेस, केएमटी बसेस ही वाहने सरळ रंकाळा टॉवरकडे न जाता साकोली कॉर्नर मार्गे रंकाळा टॉवरकडे अगर पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
– शालिनी पॅलेस येथून रंकाळा टॉवरकडे जाणारी जड–अवजड वाहने, टेंपो ट्रॅव्हलर, एस.टी.बसेस, केएमटी बसेस सरळ रंकाळा टॉवरकडे न जाता आवश्यकतेनुसार क्रशर चौक मार्गे जाणार.
– जावळाचा गणपतीकडून रंकाळा टॉवर चौकात येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.








