सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ बुधवार पेठच्या देणगी कुपन शुभारंभ
प्रतिनिधी /फोंडा
बुधवार पेठ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाला श्रीपूजनासाठी कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने सुसज्ज मार्केट प्रकल्पाच्या बाजूला सभागृहाची उभारणीसाठी निविदा प्रक्रीया पुर्ण झालेली आहे. पुढील वर्षी सभागृहाचे कामही पुर्णत्वास येऊन उत्सवासाठी सभागृह उपलब्ध असेल. त्यामुळे भर उन-पावासात बसून सामानाची विक्री करणाऱया व्यापाऱयाचीही कायमची सोय होणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री रवी नाईक यांनी केले.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ बुधवार पेठच्या देणगी कुपनाचा शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फोंडा पालीकेचे नगरसेवक आनंद नाईक, मंडळाचे पदाधिकारी मिलींद म्हाडगूत, शंकर नाईक, दिगंबर नागेशकर, मंडळाचे अध्यक्ष महेश सतरकर, सचिव उमेश धामसकर, खजिनदार तथा कुर्टी पंचायतीचे माजी सरपंच दादी नाईक उपस्थित होते. यंदा मंडळाचे 36 व्या वर्षात पदार्पण करीत असून कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालखंडात उत्सव मर्यादीत उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा भाविकांमध्ये मोठय़ा उत्साहात उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते देणगी कुपन विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी मंडळाच्या कामासाठी मार्केट प्रकल्पात तात्पुरते कार्यालयही उपलब्ध करून दिल्यामुळे पदाधिकाऱयानी आभार व्यक्त केले. नगरसेवक आनंद नाईक यांनी गणेशोत्सव मंडळाला शुभेच्छा दिल्या.
स्वागत शंकर नाईक यांनी केले. प्रास्ताविक रामदास कशाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश सतरकर यांनी केले. दादी नाईक यांनी आभार मानले.









