वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘पेपरफ्राय’चे सीईओ अंबरीश मूर्ती यांचे लेहमध्ये हृदयविकाराच्या झटक्मयाने निधन झाले. कंपनीचे सहसंस्थापक आशिष शाह यांनी याला दुजोरा दिला आहे. ते 51 वर्षांचे होते. अंबरीश मूर्ती यांनी आशिष शाह यांच्या भागिदारीत फर्निचर आणि घरातील सामानाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी 2012 मध्ये ‘पेपरफ्राय’ची स्थापना केली. ‘पेपरफ्राय’ची स्थापना करण्यापूर्वी अंबरीश यांनी भारत, फिलीपाईन्स आणि मलेशियामध्ये ‘ईबे’साठी कंट्री मॅनेजरचे पद भूषवले होते. याआधी मूर्ती हे ‘लेव्ही स्ट्रॉस इंडिया’मध्ये ब्रँड लीडर होते. तसेच ते ब्रिटानिया इंडस्ट्रीजशी विपणन व्यवस्थापक म्हणूनही संबंधित होते. ते आयआयटी कलकत्ताच्या 1996 च्या बॅचचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी 1994 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केली होती.









