भारतीय वैज्ञानिकाचा दावा
अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय कॉम्प्युटर सायंटिस्टने चालू वर्षाच्या अखेरपर्यंत मानवी चेतना (ह्यूमन कॉन्शियसनेस) कॉम्प्युटरवर अपलोड होऊ शकेल असा दावा केला आहे. याकरता त्याने लोकांकडून कुटुंबातील वृद्ध तसेच प्रिय सदस्यांचा आवाज अन् व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले आहे.
2डी, 3डी, होलोग्राम आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या मदतीने लोकांना पुन्हा जिवंत केले जाऊ शकते. ट्रान्स्क्रीप्ट डाटा, न्यू व्हॉइस सिंथेसिस आणि व्हिडिओ मॉडेलच्या मदतीने लवकरच ह्यूमन कॉन्शियसनेसला कॉम्प्युटरवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते असे डॉक्टर प्रतीक देसाई यांनी म्हटले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि होलोग्राम तंत्रज्ञानाद्वारे मृत व्यक्तीला डिजिटल स्वरुपात पुनर्जीवित केले जाऊ शकते. ह्युमन कॉन्शियसनेसला

कॉम्प्युटरवर अपलोड करण्यासाठी एक युजर कुठल्याही व्यक्तीशी (ज्याला मृत्यूनंतरही जिवंत ठेवण्याची इच्छा आहे) निगडित सर्व माहिती म्हणजेच त्याचा आवाज, छायाचित्रे, व्हिडिओ एआय सिस्टीममध्ये फीड केले जाऊ शकतात. याच्या माध्यमातून एआय सिस्टीम व्यक्तीची पूर्ण वैशिष्ट्यो समजून घेऊ शकते. यानंतर युजर त्या व्यक्तीसाठी एक अवतार (डिजिटल पर्सनालिटी, जो दिसण्यास त्या व्यक्तीप्रमाणे असेल) डिझाइन करू शकतो. मग एआय सिस्टीमध्ये फीड इन्फॉर्मेशनद्वारे युजरसोबत संभाषण करू शकेल.
किसानजीपीटीडॉ. प्रतीक देसाई यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीमध्ये अनेक एआय स्टार्टअप सुरू केले आहेत. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चॅटजीपीटी प्रमाणेच एक चॅटबॉट-किसानजीपीटी तयार केला आहे. सध्या यावर अजून काम सुरू आहे.
बोर्डेनचा डिजिटल पुनर्जन्म
अमेरिकेतील प्रख्यात शेफ आणि टीव्ही प्रेझेंटर एंथनी बोर्डेनवर तयार माहितीपटाला त्यांच्या डिजिटल पुनर्जन्माच्या स्वरुपात पाहिले गेले. रोडरनर नाव असलेल्या या माहितीपटात 45 सेकंदांपर्यंत त्यांचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाद्वारे सादर करण्यात आला, यात बोर्डेन स्वत: बोलत असल्याचे वाटत होते. रॅपर टूपॅक शकूरला व्यासपीठावर होलोग्रामद्वारे त्यांच्या मृत्यूच्या 15 वर्षांनी सादर करण्यात आले होते.









