प्रतिनिधी / किणये :
मच्छे गावातील महादेव गल्ली, पहिला क्रॉस येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने चौघा जणांवर हल्ला केला आहे. चौघा जणांच्या हाताला व पायाला या कुत्र्याने चावा घेतला असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान गल्लीतच या कुत्र्याने हल्ला केला. यामुळे एकच खळबळ उडाली.
अंकुश शिवाजीचे ( वय 20 ) श्रेया आतवाडकर ( वय 16), गुरु आतवाडकर ( वय 5 ),रेणुका कणबरकर वय ( 45 ) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे हे चौघेजण जखमी झाले असून त्यांना गावातून सरकारी इस्पितळाला पाठवून देण्यात आले आहे.
कुत्र्याने चावा घेतल्यामुळे गावातील संतप्त तरुणांनी सदर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग सुरू केला आहे.