घरी स्वत:च विणतात, मनस्पर्शी आहे कारण
हिवाळा येताच लोकांचे स्वेटर-जॅकेट दिसू लागतात. अनेक लोक तर पाळीव प्राणी किंवा भटक्या प्राण्यांनाही स्वेटर परिधान करतात. परंतु कधी तुम्ही झाडांना स्वेटर परिधान करताना पाहिले आहे का? सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात काही लोक झाडांना स्वेटर घालत असताना दिसून येतात. हे लोक असे का करतात यामागे एक कारण असून ते मनाला स्पर्श करणारे आहे.
दक्षिण कोरियात हा प्रकार दिसून येतो. तेथील लोक झाडांना लोकरयुक्त कपडे परिधान करताना दिसून येतात. हे स्वेटर लोक स्वत:च घरात विणत असतात. तेथे झाडांना स्वेट घालणे अत्यंत सामान्य बाब आहे. हे काम एका संस्थेचे लोक राजधानी सोलमध्ये करत आहेत. या कामाला आता मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. शहरामधील अनेक झाडांना स्वेटर घालण्यात आल्याचे दिसून येते.
झाडांबद्दलचा आदर व्यक्त करण्याची ही एक पद्धत असल्याचे तेथील लोकांचे मानणे आहे. दक्षिण कोरियात हिवाळा हा तीव्र स्वरुपाचा असतो. अशा स्थितीत माणसांप्रमाणेच झाडांना याचा त्रास होऊ नये म्हणून एक संस्था ही काळजी घेत आहे. या संस्थेला आता स्थानिकांच्या सहभागामुळे हे काम वाढविणे शक्य झाले आहे.









