स्वाद वाढण्यासह आरोग्यालाही मिळतो लाभ
कॉफीत काहीसे दूध किंवा क्रीम मिसळणे सामान्य आहे, परंतु याचबरोबर आणखी एक गोष्ट कॉफीत टाकून तिची चव वाढविली जाते. जगात एकेठिकाणी कॉफीसोबत डेअरी उत्पादनाचा वापर केला होता. उत्तर स्वीडनमधील लोक कॉफीत पनीर मिसळून ती पित असतात. येथे काफेओस्ट नावाने प्रसिद्ध एक अनोखे संयोजन असून त्यात गरम कॉफी आणि एक खास प्रकारचे पतीन मिसळले जाते, ज्याला लेइपाजूस्तो म्हटले जाते. लेइपाजूस्तो नावाचा अर्थ ‘ब्रेड चीज’ असा होतो, परंतु या अजब संयोजनात कुठल्याही प्रकारचा ब्रेड नसतो, केवळ पनीर आणि कॉफी असते. याचे नाव बहुधा पनीरच्या शोषक स्वरुपामुळे पडले असावे, कारण हे काही मिनिटातच कॉफीच्या स्वादाला चांगल्याप्रकारे शोषून घेतो.
वेगळ्या प्रकारचा स्वाद
लेइपाजूस्तो स्पंजी स्वरुपाचा असतो, यामुळे तो सर्वांना पसंत पडत नाही, परंतु याचा स्वाद अनुभव घेण्याजोगा असतो, असे बोलले जाते. हे सामान्य चेडर चीजच्या तुलनेत अधिक गोड असते, याचमुळे कॉफीत टाकताच ते क्रीम किंवा दूध आणि साखर मिसळण्यासारखी चव देते. संतुलित अनुभव यामुळे मिळत असतो.
यामागील इतिहास
काफेओस्टचे स्कँडेनेवियन देश, उत्तर स्वीडन आणि फिनलंडच्या रेंडियर शिकाऱ्यांसाठी सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. भटक्या सामी लोकांनी स्वत:च्या प्रवासांदरम्यान या पनीर आणि कॉफीच्या आकर्षक संयोजनाचा आविष्कार केला होता, असे सांगण्यात येते. कॉफेओस्ट सोडियमची कमतरता दूर करण्यास सहाय्यभूत असल्याचे सामी लोकांना दिसून आले. गरम कॉफी त्यांना उबदार ठेवण्यास मदत करते, तर हिवाळ्यात प्रवास करण्यासाठी आवश्यक ऊर्जाही पुरविते. स्कँडिनेवियामध्ये कॉफेओस्टचा वापर वाढत आहे, आतापर्यंत रेंडियरच्या दुधासोबत येथे गाय आणि बकरीच्या दूधातून निर्मित पनीरद्वारे देखील याची निर्मिती केली जाऊ लागली आहे.
खास ठिकाणासाठी
मागील महिन्यात युरोपीय महासंघाने काफेओस्टला प्रोटेक्टेड डिजिग्नेशन ऑफ ओरिजिन म्हणजेच संरक्षित उत्पत्ति स्थान संकेतकाचा दर्जा दिला आहे. स्थानिक पनीर निर्मात्यांच्या पुढाकारावर हा निर्णय घेण्यात आला. हे पनीर उत्पादक स्वत:च्या खाद्यवारशाच्या एका हिस्स्याला संरक्षित करू इच्छित होते आणि क्षेत्रात कॉफीप्रेमींना आकर्षित करण्याची आशा बाळगून होते. पीओडी युरोपीय महासंघाकडून मान्यताप्राप्त प्रणाली आहे. जी खाद्य उत्पादनाची गुणवत्ता, विशिष्टता आणि प्रतिष्ठा विशेषकरून भौगोलिक क्षेत्र आणि उत्पादन पद्धतीशी निगिडत असल्यास त्याचे संरक्षण सुनिश्चित करते.









