तिरुअनंतपुरम :
महाराष्ट्राच्या मंत्र्याने केरळसंबंधी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ निर्माण झाला होता. केरळमध्ये लव्ह जिहादचा अजेंडा काही गटांकडून पुढे नेला जात असल्याने केरळला मिनी पाकिस्तान असे संबोधिल्याचे संबंधित नेत्याने स्पष्टीकरण दिले होते. या पार्श्वभूमीवर आता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी हा संघ परिवाराचा अजेंडा असल्याचे म्हणत याविरोधात राज्याच्या लोकांनी एकजूट व्हावे असे वक्तव्य केले आहे. संघ परिवाराकडून केरळच्या विरोधात अजेंडा राबविला जात आहे. केरळ ही धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिक सद्भावाची भूमी आहे. केरळच्या लोकांनी संघाच्या अशा द्वेषपूर्ण अजेंड्याच्या विरोधात एकजूट व्हायला हवे असे विजयन यांनी म्हटले आहे.









