मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन, ‘स्वाभिमान’ गोवा पोलीस पुरस्कार सोहळा

पणजी : सायबर क्राईममध्ये गुन्हे करणारे गुन्हेगार जेवढे हुशार झाले आहेत तेवढेच आमचे पोलीस त्यांच्यावर मातकरीत गुह्याचा तपास लावीत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी जनतेने सावध राहण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे केले. कांपाल येथील कला अकादमीच्या दर्यासंगम परिसरात राज हावजिंग प्रस्तूत आणि राजश्री क्रिएशन निर्मित ‘स्वाभिमान 2023’ गोवा पोलीस सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. त्यांच्या समवेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला आणि संस्कृतमंत्री गोविंद गावडे, पोलीस महानिरीक्षक जसपालसिंग, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, राज हाऊसिंगचे संदीप निगळ्ये व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की कोरोनाच्या काळात पोलीसाना सर्वात मोठी भूमिका निभावली आहे. कर्त्यव्य बजावत असताना अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशाच्या संरक्षणात जेवढे महत्त्व सेनेला दिले जाते तेवढेच महत्त्व पोलीसानाही आहे. कारण ते ही देशाचे सरक्षणकर्ते आहे. लोकांनी पोलीसाकडे वाकड्या नजरेने पहाण्यापेक्षा ते चांगले काम करतात्याकडे त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी पर्यटनमंत्री रोहन खवटे, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे याचेही पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करीत आले कर्तव्य बजावीत असल्याचे प्रसंशनीय उद्गार काढून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रथम होमगार्ड अनिल हळदणकर, रिता राजू, पोलीस कॉन्स्टेबल स्वराज नाईक, नारायण एम. कोचरेकर, विदेश एम. नाईक, दर्शन तेमकर, संजय डी. नाईक. हेड पोलीस कॉन्स्टेबल मोहन नाईक, छाया गेडकर, सुधीर तळेकर, संतोष भाटकर, सुशांत एस. सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक शबनम बी. सय्यद, अबिना एम. नोरोन्हा, सुनील फाळकर, आदेलिना परेरा व अऊण गांवस, उपनिरीक्षक अंजली गांवकर, देवू जी. मानगांवकर, ऋषिकेश पाटील, दिपेश शेटकर, रोहन नागेशकर, पोलीस निरीक्षक – नितीन हळर्णकर, सचिन लोकरे, सोमनाथ पै. बरी, ब्रेन्डन डिसोझा, रविंद्र देसाई. उपअधिक्षक : विश्वेश कर्पे, मनोज म्हार्दोळकर, श्रीमती नूतन वेर्णेकर व संतोष एस. देसाई हेडक्लार्क : सुनिल डी. नाईक. फायर फायटर : नितीन व्ही रायकर पब्लीक प्रोसेक्युटर : श्रीमती पुनम भरणे व सत्यवान राऊत देसाई. उत्कृष्ट पोलीस स्टेशन : कळंगुट पोलीस स्टेशन व वेर्णा पोलीस स्टेशन. समाजमित्र पुरस्कार : कपिल नाईक (पी.आय) व दत्ताराम नाईक (पी.आय).
लोकमान्य पुरस्कार : जिवबा दळवी उपअधिक्षक म्हापसा सुप्रिटडंण ऑफ पोलीस पुरस्कार- विश्राम बोरकर, या सर्वाना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रोहन खंवटे मंत्री गोविंद गावडे, डिजीपी जसपालसिंग, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच विविध क्षेत्रातील प्रज्योत जोडणकर, विजय पाटील, बेळगावचे माजी महापौर विजय मोरे, अनुपा जावलेकर, प्रशांत तेंडुलकर, राज नागळे, जयंत मिरीणकर, मोहनदास बखले, वनजा राणे, विनेश पिकळे, भालचंद्र आंगले, दीपक नार्वेकर, दिवाकर शिंक्रे, सागर पानवेलकर, सुभाष बोरकर, संजय मिश्रा, वामन तारी, संजीव देसाई, संतोषमुळे, संदिप निगळ्ये, नाईक, यांच्याहस्ते स्मृतिचिन्हे व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. प्रथम राज हाऊसिंगचे संदिप निगळ्ये यांनी स्वागत केले. पोलीस बॅन्ड, सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशी, हास्यजत्रामधील विशाखा सुभेदार, पाडी कांबळी व आशिष पवार पुजा आणि अपर्णा व साथी यांचा नृत्य कार्यक्रम, सिंधुराज कामत आणि गुप यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनंत अग्नी व बिजेश देसाई यांनी केले.









