शहरात जनता काका पाटलांच्या बाजूने : प्रभाग क्र. 31 काँग्रेसमय करणार
निपाणी: विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार काका पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने त्यांना येवून मिळत आहेत. अशावेळी शहरात अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक विरुद्ध जनता अशा पद्धतीचे वातावरण पाहायला मिळत असून त्यामुळे काका पाटील यांच्या पाठिंब्यात वाढ होताना दिसत आहे. निपाणीतील प्रभाग क्रमांक 31 हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. स्थानिक नगरसेवकांच्या राजकारणाला कंटाळलेल्या नागाfरकांनी स्वयंस्फूर्तीने काका पाटील यांची भेट घेत त्यांना बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला. यावेळी संपूर्ण प्रभाग काँग्रेसमय करण्याचा निर्धार करण्यात आला. तहसीलदार प्लॉटमधील कार्यकर्त्यांनी काका पाटील यांना पाठिंबा व्यक्त करून या निवडणुकीत त्यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. काका पाटील यांच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा जाहिर केला.
यावेळी आसीफ वंटमुरे, इम्रान गवाणे, आफ्रिद मकानदार, आफताब गवंडी, तौसीफ गवंडी, सोहेल पठाण, हामीद चांदकुळे, इस्माईल मुल्ला, साजीद मुल्ला, फिरोज बुदिहाळे, जाफर बुदिहाळे, शानूर जकाते, आसीफ देसाई, सादिक शेख, फजल लालखान, रौफ लालखान, दाऊद मुजावर, शाहबाझ जकाते, मोसीन गवाणे, शाहिद मंदीवाले, अमन बुदिहाळे, अमीन पठाण, अशीम पठाण, समी मुल्ला यांच्या सह असंख्य कार्यकर्ते काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ सक्रिय झाले आहेत. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुvना काझी, अनवर बागवान, शरीफ बेपारी, फारूक गवंडी, अब्बास फरास, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग 23 मध्ये जोरदार पाठिंबा
शहरातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली. वाढत्या महागाईला कंटाळून काँग्रेसला विजयी करण्याचा तसेच काँग्रेसमधून निवडून येत पक्षाविरोधात काम करणार्या नगरसेवकांना जागा दाखवण्याचा निर्धार नागाfरकांनी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यावेळी सुप्रिया पाटील, मंजिरी पाटील, मेघा पाटील, कल्पना पाटील, युवा काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव , राज ( दोस्त) पठाण, बKतीयार कोल्हापुरे, अब्बास फरास, इंद्रजीत जामदार, झाकीर कादरी, शरीफ बेपारी, जरारखान पठाण, अल्लाबक्ष भगवान, दिलीप घाटगे, अजित भोकरे, मुvना पटेल, प्रकाश पोटजाई, किरण कोकरे, राजू शिंदेवडे,, सर्जेराव शालविद्रे, राजू घाटगे, निलेश पावले, सागर महातुकडे, संदीप यादव.. तसेच वॉर्ड मधील असंख्य महिला व युवक,काँग्रेस, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग १६ मध्ये काँग्रेसचीच हवा
येथील प्रभाग क्रमांक 16 मधील मेस्त्री गल्ली, भिसे गल्ली, रावण गल्ली, बेल्लद बोल, कामगार चौक,लोणार गल्ली, कोरवी गल्ली येथे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काका पाटील यांच्या प्रचारासाठी घरोघरी प्रचार करण्यात आला. नागाfरकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.









