सर निल्स असे पेंग्विनचे नाव
सर निल्स एडिनबर्ग नावाचा पेंग्विन प्राणिसंग्रहालयात राहतो, अलिकडेच त्याचीकाही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. ही छायाचित्रे प्राणिसंग्रहालयाच्या अधिकृत ट्विटर (आता एक्स) पेजवरून शेअर करण्यात आली आहेत. सर निल्स ओलाव तृतीयला नॉर्वेजियन किंग्स गार्डकडून मेजर जनरलची उपाधी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सर निल्सला आता नॉर्वेच्या सैन्यात तिसऱ्या क्रमांकाचे पद मिळाले असल्याचे या छायाचित्रांच्या कॅप्शनदाखल प्राणिसंग्रहालयाने नमूद केले आहे.

प्राणिसंग्रहालयाने पेंग्विन आणि त्याच्या आयुष्याबद्दल अधिक माहिती देत एक ब्लॉक लिंक शेअर केला आहे. यानुसार सर निल्स ओलाव किंग्स कार्डचा मॅस्कॉट आहे. निल्स ओलाव आणि त्याच्या कुटुंबाला मासे, ख्रिसमस कार्ड पाठविणे आणि टॅटूमध्ये युनिटच्या भागीदारीदरम्यान त्यांना भेटण्याची परंपरा बटालियनाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण हिस्सा राहिला आहे. याचबरोबर एडिनबर्ग प्राणिसंग्रहालयात उर्वरित पेंग्विनसाठी उदाहरण ठरण्याकरता ऑगस्टमध्ये त्याची पदोन्नती गार्डच्या मॅस्कॉटच्या स्वरुपात त्याच्या कारकीर्दीतील एक मैलाचा दगड आहे. पेंग्विन पूर्वी नॉर्वेच्या सैन्यात ब्रिगेडियर पदावर होता. आता तो मेजर जनरल सर निल्स ओलाव तृतीय, बाउवेट बेटसमूहाचा बॅरन आणि नॉर्वेच्या किंग्स गार्डचा अधिकृत मॅस्कॉट असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून म्हटले गेले आहे.
प्राणिसंग्रहालयाच्या या पोस्टला आतापर्यंत 13 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर हजारो लोकांनी याला लाइक केले आहेत. केवळ या सैन्याधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करू असे एका युजरने नमूद केले आहे. एडिनबरा येथील प्राणिसंग्रहालयातील निल्स ओलाला 1972 मध्ये नॉर्वेछया शाही सैनिक तुकडीचा मानद सदस्य करण्यात आले होते. तेव्हा नॉर्वेच्या सैन्याचे जनरल निल्स एगलिन प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी आले होते. त्यांनी स्वत:चे नाव आणि नॉर्वेचे तत्कालीन राजे ओला पंचम यांच्या नावावर पेंग्विनला निल्स ओला हे नाव दिले होते. तेव्हापासून दरवर्षी एडिनबराच्या वार्षिक सैनिक महोत्सवात सामील होण्यासाठी येणारी नॉर्वेची शाही सैनिक तुकडी सर निल्सची भेट घेण्यासाठी प्राणिसंग्रहालयाचा दौरा करत असते.









