कट्टा / वार्ताहर
आज कट्टा बाजारपेठ येथे संपन्न झालेल्या मीटिंग मधे विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नवीन पदाधिकऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आणि सूचना व अडचणी समजून घेण्यात आल्या.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, युवासेना समन्वयक मंदार ओरासकर ,युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, अक्षय रेवंडकर , महिला विभागप्रमुख लता खोत, विभागप्रमुख कमलाकर गावडे ,उपविभागप्रमुख उमेश प्रभू आणि शिशुपाल राणे , दर्शन म्हाडगुत, बाबू टबुलकर , वंदेश ढोलम, देवदास रेवडेकर , शेखर रेवडेकर, संदीप सावंत , गणेश गाड , हर्षद मोरजकर , जगदीश मोरजकर , राजु परब ,प्रसाद दळवी , बाळा पेडणेकर , किशोर भगत, विजय धामापुरकर , भिवा तळगावकर यांसह विभागातील सर्व शाखाप्रमुख आणि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
यावेळी सर्वांच्या एकमताने युवासेना पेंडुर विभागप्रमुख पदी वंदेश ढोलम, शिवसेना कट्टा शाखाप्रमुख पदी गणेश गाड , उपशाखाप्रमुख पदी हर्षद मोरजकर, शिवसेना काळसे शाखाप्रमुख पदी चंद्रकांत उर्फ पप्या राऊळ ,युवासेना कट्टा शाखाप्रमुख पदी भूषण ढोलम, सिद्धार्थ हिरवे , युवासेना पेंडूर शाखाप्रमुख पदी संदीप सावंत या सर्वांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.









