वृत्तसंस्था/ गयाना
यजमान विंडीज आणि भारत यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या सामन्यात पूरनने मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्ध जाहीरपणे टिका केली होती. या वागणुकीमुळे पूरनला आता मानधन रकमेतून 15 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
या सामन्यातील भारताच्या डावातील चौथ्या षटकात भारतीय फलंदाजाविरुद्ध पायचितचा रेव्ह्यू विंडीजने घेतला होता. हा रिव्ह्यू घेताना मैदानावरील पंचांनी संबंधित खेळाडूचा रिव्ह्यू घेतल्याबद्दल पूरनने पंचाविरुद्ध टीका केली. पुरनने या सामन्यात दर्जेदार फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आयसीसीच्या शिस्तपालन समितीने पूरनला दंड करण्याचा निर्णय जाहीर केला.









