वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेत आयपीएल स्पर्धेच्या नियमावलीच्या भंग केल्याबद्दल राजस्थान रॉयल्स संघातील फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला स्पर्धा आयाजकांनी सामना मानधनातील 25 टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे.
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील झालेल्या सामन्यावेळी अश्विनकडून स्पर्धा नियमावलीचे उल्लंघन झाले होते. बुधवारी झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा केवळ 3 धावांनी पराभव केला होता. रविचंद्रन अश्विनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.









