वृत्तसंस्था/ कोलकाता
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघातील वेगवान गोलंदाज रमनदीप सिंगला स्पर्धा आयोजकांनी दंड केला आहे. या सामन्यामध्ये रमनदीपने आयपीएलच्या नियमावलीचा भंग केल्याने त्याला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. या सामन्यात रमनदीप सिंगने 8 चेंडूत 17 धावा जमवित आपल्या संघाला सर्व प्रथम प्ले ऑफ गटातील स्थान निश्चित केले आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करत या स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात सर्वप्रथम स्थान काबिज केले आहे.









