वृत्तसंस्था / लंडन
लॉर्डस् मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळाच्या चौथ्या दिवशी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडून मैदानात बेशिस्त वर्तन घडल्याने त्याला आयसीसीच्या शिस्तपालन समितीने दंड ठोठावला आहे.
या कसोटीतील रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजने विचित्र हावभाव करत काही अपशब्द वापरल्याचे दिसून आले. याची दखल घेत सिराजवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याला मिळणाऱ्या सामना मानधनातील 15 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.









