वृत्तसंस्था/ मिरपूर
बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागण्याबरोबरच दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले. षटकांची गती न राखल्याबद्दल भारताला सामना मानधनातील 80 रकमेचा दंड आयसीसीने केला आहे. या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी 7 रोजी खेळविण्यात येणार आहे.
‘भारताने निर्धारित वेळेत चार षटके कमी टाकल्याचे आढळून आल्यानंतर सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी संघावर ही दंडात्मक कारवाई केली आहे,’ असे आयसीसीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने गुन्हा मान्य करून कारवाई स्वीकारली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणी घेण्याची गरज लागली नाही. मैदानी पंच मायकेल गॉ, तन्विर अहमद, तिसरे पंच शर्पुद्दौला इबने शाहिद व चौथे पंच गाझी सोहेल यांनी हा आरोप केला होता. आयसीसी आचारसंहितेनुसार निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्यास खेळाडूंना 20 टक्के मानधन रकमेचा दंड करण्यात येतो.









