भारतातील अनोखे गाव, स्वत:चा वेगळा कायदा
भारताच्या प्रत्येक हिस्स्यात कुठली न कुठली परंपरा दिसून येते. देशातील मलाणा या गावात बाहेरील व्यक्तींना कुठल्याही गोष्टीस स्पर्श करण्यास मनाई आहे. जर एखाद्या व्यक्तीने गावातील कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यास त्याला दंड भरावा लागतो. तसेच या गावात व्हिडिओ तयार करण्यास बंदी आहे. ग्रामस्थांच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांना केवळ छायाचित्रे काढण्याचीच अनुमती आहे.
लाकूड पेटविण्यास मनाई
मलाणामध्ये लाकूड जाळण्यास मनाई आहे. रोपांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येथे कनाशी नावाची स्थानिक भाषा बोलली जाते. या मलाणा गावाच्या नियमुंनसार बाहेरील लोकांना कनाशी भाषा शिकता येत नाही. भाषेचा वापर केवळ गावातील लोकांकडूनच केला जातो.
दुकानाबाहेर ठेवा पैसे
या गावात एखादा पर्यटक आल्यास आणि त्याला काही खरेदी करायचे असल्यास त्याला दुकानात प्रवेश दिला जात नाही. त्याला दुकानाबाहेर थांबूनच दुकानदारांशी संवाद साधावा लागतो आणि दुकानाबाहेरच पैसे ठेवावे लागतात. दुकानदार हे पैसे उचलून संबंधित वस्तू पर्यटकाला देत असतो. स्वत:ची न्यायपालिका
आमच्या देशात केंद्र सरकारचा आदेश मानला न जाणारा कुठलाच हिस्सा नसेल. परंतु मलाणाची स्वत:ची न्यायपालिका आणि कार्यपालिका आहे. या गावात आजवर कुणीच पोलीस बोलाविण्याचे कृत्य केलेले नाही. प्रत्येक निर्णय गावातील लोक मिळून घेतात आणि त्याचे कटाक्षाने पालन करतात.
गावाचे नियम
मलाणाचे स्थानिक रहिवासी स्वत:ला अलेक्झेंडरचे वंशज मानतात. याचमुळे ते स्वत:ला एक शुद्ध आर्य वंशाचे ठरवत असतात. यामुळे मलाणात कुठल्याही बाहेरील व्यक्तीला स्पर्श करण्याची अनुमती नाही. मलाणा गावी जाण्यासाठी प्रथम कसोल येथे जावे लागते.









