ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून आंतरराष्ट्रीय तापळीवर देशाची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात एका भाषणादरम्यान पेगासस प्रकरणावरून पंतप्रधान मोंदीवर टीका केली होती. जगभरात कौतुक केलं जाणाऱ्या पंतप्रधानांवर अशा प्रकारे टीका करणे म्हणजे खरंतर राहुल गांधी यांच्या डोक्यातच पेगासस आहे, असे भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकूर म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. मोदींनी सशक्त भारत निर्माण केला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत असल्याने राहुल गांधी मोदींच्या बदनामीच्या मागे लागले आहेत. ते परदेशात जाऊन मोदींची बदनामी करतात आणि संसदेत, कोर्टात येऊन माफी मागतात.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
केंब्रिज विद्यापीठात बोलताना राहुल गांधी यांनी पेगासस प्रकरणावरुन मोदींवर निशाणा साधला होता. माझ्यासह अनेक बडय़ा नेत्यांच्या फोनमध्य पेगासस होता. या पेगाससद्वारे आमच्यावर पाळत ठेवली जात होती. आमचे महत्त्वाचे फोन टॅप केले जात होते. त्यामुळे अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांनी मला फोन करुन सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला होता. मोदी सरकारकडून माध्यमे आणि न्यायव्यवस्थाही नियंत्रित केली जात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
अधिक वाचा : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; मॉर्निंग वॉकदरम्यान घडली घटना








