डा?. यशवंतसिंग परमल कृषी विद्यापीठ हिमाचल प्रदेश आणि शारदा उच्च माध्यमिक विद्यालय वझरी यांच्यात कृषी विषय करार
प्रतिनिधी /पेडणे
गोवा राज्यात शेतीला वातावरण पूरक असून एकीकडे आम्ही शेती नष्ट होत आहे असे काहीजण म्हणत असतानाच गोव्यातील शेतकऱयांचा नैसर्गिक शेतीकडे कल असल्याचे दिसत आहे. शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ यशवंतसिंग परमल कृषी विद्यापीठ हिमाचल प्रदेश आणि शारदा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यात प्राकृतिक शेती विषयक मार्गदर्शनासाठी करार झाला आहे. याचा लाभ शेतकऱयांना होऊन येणाऱया काळात पेडणे तालुका हा गोवा राज्यातील प्राकृतिक शेतीसाठी ओळखला जाणार आहे, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी वझरी येथे बोलताना केले.
शारदा उच्च माध्यमिक विद्यालय वझरी आणि कृषी विद्यापीठ हिमाचल प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने प्राकृतिक शेती याविषयी कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ यशवंत परमार कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेश्वर चंदलजी, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डॉ. राजेंद्र भट, ओल्ड गोवा येथील कृषी विभागाचे संचालक प्रवीण कुमार, माजी जि. पं. सदस्य प्रताप भेंडाळकर, श्रीधर शेणवी देसाई, प्राचार्य गजानन मराठे, पा. शि. संघाच्या अध्यक्षा संगीता गावकर आदी उपस्थित होते.
शेती व्यवसाय नष्ट होणार नाही. पेडणे तालुक्मयात असून शेतीसाठी पूरक वातावरण आता प्राकृतिक शेतीसाठी शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ यशवंतसिंग परमल कृषी विद्यापीठ हिमाचल प्रदेश आणि शारदा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यातील कराराच्या फायदा पेडणे तालुक्मयातील शेतकऱयांना होऊन त्यांच्या शेती उत्पादनात भरघोस वाढ होऊन आर्थिक स्तर उंचवणार आहे. असेही आर्लेकर यावेळी म्हणाले.
प्राकृतिक शेतीसाठी गोव्याची ओळख निर्माण व्हावी!
देशातील शेतकऱयांचे शेती पिकवून मिळणारे उत्पन्न हे दुप्पट व्हायला पाहिजे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकरी जे उत्पन्न घेतो त्यात त्यांना मोठा प्रमाणात विविध कारणासाठी आणि खतासाठी खर्च होतो. हा खर्च कमी व्हावा तसेच शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 2018 मध्ये प्राकृतिक शेती शेतकऱयांनी करावी, यासाठी मोहीम सुरू केली आणि या मोहिमेचा शुभारंभ हा हिमाचल प्रदेश येथून सुरु झाला, अशी माहिती राजेंद्र आर्लेकर यांनी दिली.
आज देशातील कृषी विषय धोरण राबविताना डॉ. यशवंतसिंग परमार कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. राजेश्वर चंदेलजी हे या विषयाचे तज्ञ असून ते पंतप्रधानांना कृषी विषयक धोरण ठरविताना जे सल्लागार मंडळ आहेत, त्यात त्यांचा समावेश आहे. आज पेडणे तालुक्मयासाठी आणि गोवा राज्यासाठी डॉ. राजेश्वर चंदेलजी यांचा मार्गदर्शक म्हणून निश्चितच फायदा होणार असून त्याचा लाभ पेडणे तालुक्मयातील शेतकऱयांनी घ्यावा असे आवाहन केले.
शारदा विद्यालयात कृषी डिप्लोमा सुरू करणार !
पेडणे तालुक्मयातील जे विद्यार्थी दहावी बारावी उत्तीर्ण होतात. त्यांतील शेती विषयाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना कमी कालावधीचे विविध प्रकारचे कृषी विषयक ज्ञान मिळवून देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी डिप्लोमा कोर्स सुरु होणर आाहे. पुढील वर्षापासून शारदा उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू करण्यात येणार असून आज जो करार झाला त्यात याचाही समावेश आहे, असे राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
प्रास्तविक करताना प्राचार्य गजानन मराठे यांनी शारदा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे गेली अनेक वर्षे विविध उपक्रमाचा आढावा घेतला. आज कृषी विषयक हिमाचल प्रदेश येथील परमार कृषी विद्यापीठ व शारदा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्यात होणारा करार हा विद्यालयाच्या इतिहासातील सुवर्ण दिवस ठरणारा आहे. याचा फायदा पेडणे तालुक्मयालाच नव्हे तर संपूर्ण गोवा राज्याला होणार असून या करारानुसार येणाऱया काळात प्राकृतिक शेती करण्यासाठी शारदा विद्यालयातर्फे विविध उपक्रम आणि प्रशिक्षण वर्ग सुरु करुन नैसर्गिक शेती कशी करावी याचे धडे देऊन भारत देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही सर्वांनी सहकार्य करुया, असे आवाहन प्राचार्य मराठे यांनी केले.
यावेळी शारदा उच्च माध्यमिक विद्यालय वझरी आणि यशवंतसिंग परमार कृषी विद्यापीठाचे याच्या कृषी विषय करारावर सह्या करण्यात आल्या. या कार्यक्रमाला पेडणे तालुका अधिकारी प्रकाश राऊत, पणजी कृषी कार्यालयाचे अधिकारी प्रसाद परब, प्रगतशील शेतकरी उदय प्रभुदेसाई, दिलीप नारुलकर, प्रवीण तिळवे, श्रीराम साळगावकर, नारायण नाईक, प्रमोद महाले, प्रतिमा साळगावकर, चांदेला-हंसापूरचे सरपंच तुळशीदास गावस सूत्रसंचालन वृदन परब यांनी केले तर आभार संपदा परब यांनी मानले.









