तिळारी धरणाचे पाण्यामुळे बैलपार नदीला पूर
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयाला मुसळधार पाऊसाने झोडपले. तिळारी धरणाचे पाणी आल्याने बैलपार नदीला पूर आला. मोपा पठारावरील पाणी सकाळी सोडल्याने निगळ – पोरस्कडे परिसरात शेती बागायतीत पाणी जाऊन शेतकऱयांचे नुकसान झाले.
सरकारने हायअर्लट जारी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तिराळी धरणाचे पाणी दुपारपर्यंत बैलापार नदीत तसेच नदीशेजारी परिसरात पसरुन ते पाणी शेती बागायतीत गेल्याने शेतकऱयाचे नुकसान झाले.
तिळारी धरणाचे सातपैंकी सहा दरवाजे उघडले असून त्याचा संध्याकाळपर्यंत प्रवाह मोठा नव्हता. मात्र पाऊस वाढल्यास मोठय़ा प्रमाणात पाणी पेडणे तालुक्मयात येण्याची शक्मयता आहे.
मोपा विमानतळ पठारावरील पाणी सोडल्याने ते पाणी निगळ, खाजने, पोरस्कडे परिसरात मोठय़ा प्रमाणात आले. पाणी नईबाग येथील मळय़ात स्थिरावल्याने याठिकाणी समुद्राच्या स्वरुप आले.









