माटोळीसह सणासाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत दाखल, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
पेडणे : पेडणे बाजार चतुर्थी सणासाठी सज्ज झाला असून रविवारी माटोळी तसेच अन्य चतुर्थीसाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. नागरिकांनी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी केली. पेडणेत चतुर्थीचा बाजार दरवषी दोन दिवस आधी भरतो. यंदा रविवारी सुट्टीच्या दिवशी हा बाजार भरला. सुट्टी असल्याने नोकरवर्ग तसेच विविध सरकारी कार्यालयात काम करणारे कर्मचारी यांनी रविवाराचा फायदा उठवत बाजारात विविध प्रकारच्या वस्तू तसेच साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली. यंदा बाजारात माटोळीसाठी लागणारी बागायती फळे तसेच रानफळे विविध प्रकारच्या भाज्या व अन्य साहित्याने बाजार गजबजून गेला. पेडणे तालुक्मयासह विविध भागातून तसेच सिंधुदुर्ग जिल्हातून सातार्डा, शिरोडा, बांदा, नेतार्डे भागातील महिला तसेच पुऊष हे सामान घेऊन दरवषी पेडणे बाजारात चतुर्थीच्या उत्सवानिमित्त येतात.
हरण दुर्मीळ झाल्यानश दर चारपट
यंदा हरण हे डोंगराळ भागात उगविण्याचे प्रमाण कमी आहे. हरण हे खास माटोळीसाठी बांधले जाते. बाजारात हरणाचा दर कमालीचा वाढलेला दिसून आला. काही प्रमाणात सिंधुदुर्गातून हरण विकण्यासाठी आले. हरणाची लहान जुडी ही शंभर ऊपये प्रति दराने विकण्यात आली. याबाबत एक गणेशभक्त राजू किनळेकर म्हणाले, हरण आम्ही दरवषी तुये पठारावऊन आणत होतो. मात्र यंदा हरण उगवलेच नाही. त्यामुळे बाजारात आज एकदम छोटी जुडी ही शंबर ऊपये विकत घ्यावी लागली.
गावठी भाज्यांची मांदियाळी
चतुर्थी सणासाठी मोठ्या प्रमाणात गावठी भाज्या बाजारात आल्या. आणि खास करून चुरण, गावठी भेंडी, दोडगी, केळी, मुळे, लाल भाजी तसेच काकडी, विविध प्राकारची फळे व अन्य भाज्या विक्रीसाठी आल्या होत्या. संत्री, मोसंबी, सफरचंद पेरू, चिकू आदीसह अन्य फळे विक्रीसाठी उपलब्ध होती. चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारात यंदा फटाक्मयाची दुकाने, विविध दुकानावर रंगीबेरंगी पताका तसेच प्लास्टिकचे हार आणि अन्य सजावटीसाठी लागणारे वस्तू यामुळे दुकाने सजलेली होती. किराणा माल दुकानातही खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसत होती. मकर सजावटीसाठी लागणारे थर्माकोल आणि पताका याही वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पेडणे , मांद्रे कोरगाव , धारगळ , वजरी , मोरजी, नागझर आदी ठिकाणी चिकण मातीच्या मूर्ती बनविल्या जातात. समान्यपणे चतुर्थीच्या आदल्या दिवशी भक्तगण गणेशमूर्ती आपल्या घरी आणतात. त्यामुळे आज सोमवारी आज बहुतांश भाविकांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन होण्याची शक्यता आहे.









