Pedicure Tips : चेहऱ्याची आपण नेहमीच काळजी घेतो. पण हात आणि पायाची काळजी घेणे तेवढेच गरजेचं आहे. पावसाळ्यात तरी पायांची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी पेडिक्युअर करणे गरजेचे असते. कारण एकतर पायावर आणि नखांमध्ये खूप माती जाते. प्रत्येकवेळी तुम्हाला पार्लरला जाऊन पैसे खर्च करणे शक्य होत नाही. अशावेळी घरच्या घरी देखील तुम्ही पेडिक्युअर करू शकता. यासाठी तुम्हाला जादा पैसे खर्च करावे लागत नाहीत. काही ट्रिक्स वापरून तुम्ही पाय स्वच्छ ठेवू शकता. कसे चला तर जाणून घेऊया.
साहित्य
शाम्पू
लिंबू-१ ते दीड
दही- २ चमचे
बेकिंग सोडा- १ चमचा
साखर- १ चमचा
कृती
सुरुवातीला नखे कापून घ्या. त्यानंतर एका बादलीत गरम पाणी घ्या. त्यात १ चमचा बेकिंग पावडर , अर्धा लिंबू आणि शाम्पू टाका. आता पाण्यामध्ये १० मिनिटे पाय बुडवून ठेवा. त्यानंतर ओले पाय असताना नखातील घान काढून टाका. यासाठी टूल किंवा नेलकटरमध्ये असणाऱ्या टूलचा वापर करा. त्यानंतर दह्यामध्ये अर्धा लिंबू पिळा हे मिश्रण पायाला लावा. ५ ते ७ मिनिटे मसाज करून १० मिनिटे तसेच पायावर ठेवा. त्यानंतर टाॅवेलने किंवा नॅपकीनने पुसून काढा. परत बादलीतील पाण्यात १० मिनिटे पाय ठेवा. आता पाय कोरडे करून घ्या. आता साखरमेमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबू पिळा. आता हे मिश्रण पयाला स्क्रब करा. ५ ते १० मिनिटे स्क्रब करा. आता स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्या. आता पाय कोरडे करा त्याला माॅश्चराईझर लावा. यानंतर तुमचे आवडते नेलपाॅलिश लावा. झाले तुमचे पेडिक्युअर. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









