Homemade Foot Scrub: हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे जास्त गरजेचे असते.विशेष म्हणजे थंडीत फाटलेल्या टाचा, खराब झालेले पाय कोणालाही आवडत नाहीत. जर तुमचे पाय, टाचा आधीच फाटलेले असतील तर त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आज घरच्या घरी पेडिक्युअर
कसं करायचं हे जाणून घेऊयात
बेकिंग सोडा आणि लिंबू
एका वाटीत तीन चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये एक लिंबू पिळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायांना लावण्यापूर्वी तुमचे पाय कोमट पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा. त्यामुळे त्वचा मऊ होईल आणि मग लगेच खराब झालेल्या पायांपासून सुटका मिळेल.यांनतर पाय स्वच्छ पुसून घ्या.आणि पेस्ट आपल्या संपूर्ण पायावर लावा आणि सुमारे १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.बेकिंग सोडापासून बनवलेले स्क्रब पायावरील खाज आणि पुरळ यापासून आराम देऊ शकतो.तसेच पाय मऊ होतात
मीठ आणि खोबरेल तेल
ज्यांची टाच कोरडी आणि भेगा पडल्या आहेत त्यांना या फूट स्क्रबचा फायदा होईल. यासाठी एक चमचा मीठ आणि पाव कप खोबरेल तेल घ्या.ते चांगले मिक्स करा आणि वापरण्यापूर्वी काही दिवस कंटेनरमध्ये ठेवा. नंतर थोडेसे घ्या आणि पायांना रोज रात्री लावा.यामुळे तुमच्या पायांना नक्कीच आराम मिळेल.
दही आणि लिंबू
एक वाटी दही घ्या. त्यामध्ये एक लिंबू पिळून घ्या. आणि मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.कोणताही स्क्रब करण्यापूर्वी कोमट पाण्यात पाय काही वेळ भिजवून ठेवावेत. यानंतर पाय स्वच्छ पुसून घेऊन त्यावर दही आणि लिंबूचा स्क्रब लावून १० मिनिटे मसाज करावा. यांनतर ही पेस्ट वाळेपर्यंत पायावर तशीच ठेवावी. आणि थोड्या वेळानंतर नॅपकिन किंवा टिशूने पुसून काढावी. यामुळे पायावरील टँनिंग कमी होण्यास मदत होते. तसेच पायावरील भेगाही कमी होतात.
पायाचा स्क्रब झाल्यांनतर त्यावर कोणतीही फूटक्रीम किंवा मॉइस्चरायझर लावावे. अशापद्धतीने तुम्ही घरच्या घरी पेडिक्युअर करून पायांचे सौंदर्य वाढवू शकता.
(वरील माहिती ही सर्वसाधारण माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Previous Articleसरवडेत कालव्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू, परिसरात हळहळ
Next Article आम्हाला आमची जमीन परत पाहीजे- उद्धव ठाकरे









