बेळगाव : येथील ‘अरिहंत हॉस्पिटल’मध्ये बाल हृदयरोग तज्ञ म्हणून डॉ. गोविंद औरादकर रुजू झाले. त्यांच्या अनुभवाचा बालरुग्णांना लाभ होणार आहे. बागलकोट येथील निजलिंगप्पा वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस पदवी घेतली. बेळगावच्या जेएनएमसी कॉलेजमधून बालरोग शास्त्र विषयामध्ये एमडी पदवीसह विशेष प्रावीण्य मिळविले. याच क्षेत्रात सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी बेंगळूरमधील जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च येथून डीएम पूर्ण केले. ते बालहृदयरोग सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि आयएमए या प्रतिष्ठित संस्थांशी संलग्न आहेत.
रुजू झाल्यानंतर त्यांनी 42 वर्षीय महिला रुग्णावर ‘अॅट्रीयल सेप्टल डिफेक्ट’ची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. अशा शस्त्रक्रियेसाठी आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या उपकरणाचा त्यांनी वापर केला असून उत्तर कर्नाटकातील ही पहिली प्रक्रिया ठरली. सदर रुग्णाला हृदयाच्या वरील भागात असलेल्या मोठ्या छिद्रामध्ये थकवा, धडधडणे व श्वास घेण्यास त्रास होत होता. वेळेवर उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे ओपन हार्ट सर्जरीऐवजी ट्रान्सकॅथेटर तंत्राचा वापर केला. रुग्णाने उत्तम प्रतिसाद दिल्याने 48 तासांच्या आत त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
हृदयरोग समस्येवर उपचार
डॉ. गोविंद औरादकर ‘अरिहंत’मध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे हृदयरोग समस्येला तेंड देणाऱ्या लहान मुलांवर विविध योजनेंतर्गत कोणतीही चिरफाड न करता हृदयाचे छिद्र बंद करण्याबाबत उपचार होणार आहेत. शालेय आरोग्य योजनेंतर्गतही लहान मुलांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. ‘अरिहंत हॉस्पिटल’ आरोग्याच्यादृष्टीने व रुग्णांची गरज लक्षात घेऊन कार्य करत आहे.
-डॉ. एम. डी. दीक्षित,हृदयरोगतज्ञ व वैद्यकीय संचालक, अरिहंत हॉस्पिटल









