रत्नागिरी :
तालक्यातील जाकादेवी बाजारपेठ येथे दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल़ा ही घटना बुधवारी दुपारी घडल़ी शिवाजी गोविंद कुळ्यो (वय 50, ऱा तरवळ कुळ्योवाडी, रत्नागिरी) असे त्यांचे नाव आह़े.
दरम्यान, कुळ्ये यांच्या अपघाती मृत्यूची खबर समजताच मोठा जमाव जिल्हा ऊग्णालयात दाखल झाल़ा यावेळी संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तरवळ ग्रामस्थांकडून करण्यात आल़ी. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चालक श्रीराज प्रसाद सावंत (23, ऱा मांजरे देसाईवाडी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल केल़ा शिवाजी कुळ्यो हे कामानिमित्त 3 ऑगस्ट रोजी जाकादेवी बाजारपेठ येथे आले होत़े दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ते रस्ता ओलांडत असताना श्रीराज सावंत याच्या दुचाकी त्यांना धडक बसल़ी या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल केल़े येथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा ऊग्णालयात पाठवल़े तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केल़े
शिवाजी कुळ्यो यांचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याचे समजताच तरवळ येथील ग्रामस्थांनी जिल्हा ऊग्णालयाकडे धाव घेतल़ी सायंकाळी उशिरा मोठा जमाव ऊग्णालय परिसरात दाखल झाला होत़ा जाकादेवी बाजारपेठ हा वर्दळीचा परिसर असताना संशयित वेगाने गाडी चालवत होत़ा त्यामुळे त्याच्यावर कठोर स्वऊपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल़ी दरम्यान शिवाजी यांचा मुलगा सुमित कुळ्यो याने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आह़े या प्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक नितीन कदम करत आहेत़








